शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

नाशिक  महापालिकेच्या शिक्षण विभागात ‘घ’ घोटाळ्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 1:06 AM

: महापालिकेच्या ९० पैकी २७ शाळांमध्ये गणवेश पुरवठा झाला असून, ६३ शाळांमध्ये मात्र विद्यार्थ्यांना गणवेशाविनाच स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागला,

नाशिक : महापालिकेच्या ९० पैकी २७ शाळांमध्ये गणवेश पुरवठा झाला असून, ६३ शाळांमध्ये मात्र विद्यार्थ्यांना गणवेशाविनाच स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागला, असे शिक्षण विभागाच्या वतीने सांगितले गेले असले तरी प्रत्यक्षात २७ शाळांमध्ये शंभर टक्के गणवेश वाटप झालेच नसून ती धूळफेक असल्याचा आरोप काही मुख्याध्यापकांनी केला आहे. गरज भासल्यास आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही या मुख्याध्यापकांनी केली आहे.  मनपाच्या सर्वच शाळांमध्ये शंभर टक्के पुरवठा झाला नसून पुरवठादार निश्चित होत नाही तोच नगरसेवक दबावांचे फोन येऊन पुरवठ्याच्या आॅडर्स थांबवाव्या लागत असल्याची तक्रार काही मुख्याध्यापकांनी केली असून, या सर्व दबावतंत्रामुळे कारवाई झालीच तर आयुक्तांकडे नावानिशी पुरावे सादर करण्याची तयारीदेखील केली आहे. मनपा शाळांमध्ये वेळेत गणवेश मिळावे यासाठी शाळांकडे निधी वर्ग करण्यात आला आणि शालेय व्यवस्थापन समित्यांकडे जबाबदारी देण्यात आली. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे केंद्रप्रमुखांचा वा तालुका स्तर किंवा जिल्हा स्तरावरूनही दबाव नसेल असे स्पष्ट आदेश शासनाने दिले आहेत. स्वातंत्र्य दिनापर्यंत गणेवश मिळणे अपेक्षित असताना ऐनवेळी नवीन गणवेश खरेदी केल्यास वेळेत मिळणार नाही असे कारण पुढे करीत शाळांना जुनेच गणेवश खरेदीची सक्ती करण्यात आली.प्रत्येक शाळेला गणेवश खरेदीत रंग निवडीचे स्वातंत्र्य असताना प्रत्यक्षात मात्र त्यांच्यावर राजकीय व प्रशासकीय दबाव येऊ लागला. त्यामुळे गणवेश खरेदी करण्याची मुख्याध्यापकांची डोकेदुखी झाली. लोकमतने याबाबत वृत्त दिल्यानंतर आयुक्तांनी अखेरीस ९ तारखेला अधिकाऱ्यांमार्फत रंग निश्चिती करून खरेदीचे स्वातंत्र्य दिले. परंतु त्यातही साठमारी झाली. गणवेश वेळेत मिळाले हे दाखवण्यासाठी मोजक्या विद्यार्थ्यांना गणवेश देऊन प्रत्यक्षात मात्र गणवेशाचा पुरवठा झालाच नाही, असे प्रकार घडल्याचे काहींचे म्हणणे आहे आताही ६३ शाळांना गणवेश पुरवठ्यासाठी ३१ आॅगस्ट ही डेडलाइन देण्यात आली असली तरी इतक्या कमी वेळात पुरवठा करणे आव्हान आहे त्यातच नगरसेवक आणि प्रशासनाचे दबावतंत्र येत असून, त्यामुळे पुरवठादारांना आॅर्डर देतो, पण दोन दिवस थांबा अशी विनवणी करत असून, त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार ३१ आॅगस्टच्या आत शंभर टक्के गणवेश पुरवठा कसा होणार, असा प्रश्न केला जात आहे. आयुक्तांनी आता या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEducation Sectorशिक्षण क्षेत्र