Cyclists gurudwara parikrama | सायकलपटूंची गुरुद्वारा परिक्रमा

सायकलपटूंची गुरुद्वारा परिक्रमा

नाशिक : श्री गुरु नानकजींच्या ५५० व्या जयंतीचे औचित्य साधून नाशिक सायकलिस्ट संघटनेच्या काही सायकलपटूंनी महानगरातील विविध भागांत असलेल्या पाच गुरुद्वारांना सायकल परिक्रमेने जाऊन दर्शन घेतले.
गुरुद्वारा सायकल राइडचा प्रारंभ गोल्फ क्लब मैदानापासून करण्यात आला. सर्वप्रथम सर्व सदस्यांनी शिंगाडा तलावच्या गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर नाशिकरोड आणि देवळालीच्या गुरुद्वारात दर्शन घेऊन पंचवटीतील दोन गुरुद्वारांमध्ये जाऊन दर्शन घेत या अभिनव राइडची सांगता केली. या गुरुद्वारा परिक्रमेचे नियोजन देविंदर भेला यांनी केले होते. मोहींदर आणि नीता नारंग यांच्या हस्ते झेंडा दाखवून परिक्रमेला प्रारंभ करण्यात आला. परिक्रमेत वीसहून अधिक सायकलपटू सहभागी झाले होते.

Web Title:  Cyclists gurudwara parikrama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.