इंधन दरवाढ विरोधात काँग्रेसतर्फे सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:18 IST2021-07-14T04:18:16+5:302021-07-14T04:18:16+5:30

पंचवटी ब्लॉक अध्यक्ष उद्धव पवार नाशिक शहर काँग्रेसचे सरचिटणीस राजकुमार जेफ, पंचवटी ब्लाक काँग्रेस उपाध्यक्ष अणि प्रभाग अध्यक्ष मांगुलाल ...

Cycle rally by Congress against fuel price hike | इंधन दरवाढ विरोधात काँग्रेसतर्फे सायकल रॅली

इंधन दरवाढ विरोधात काँग्रेसतर्फे सायकल रॅली

पंचवटी ब्लॉक अध्यक्ष उद्धव पवार नाशिक शहर काँग्रेसचे सरचिटणीस राजकुमार जेफ, पंचवटी ब्लाक काँग्रेस उपाध्यक्ष अणि प्रभाग अध्यक्ष मांगुलाल जाधव यांच्या नेतृत्वाखाली सायकल रॅली काढण्यात येऊन वाढत्या महागाईचा निषेध करण्यात आला. या सायकल रॅलीची सुरुवात अमृतधाम गंगोत्री विहारपासून करण्यात आली. रॅलीपुढे विडी कामगार नगर, मिरची हॉटेल, नांदूर नाका, कमोद पेट्रोल पंप, विडी कामगार नगर आदी भागातून काढण्यात येऊन विडी कामगार नगर येथे समारोप करण्यात आला. याप्रसंगी सोमनाथ मोहिते, सुरेखा कटारे, किशोर जाधव, मंगला जाधव, भूषण जाधव, हरिश्चंद्र जाधव, किशोर खंडेलवाल पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

110721\184511nsk_36_11072021_13.jpg

इंधन दरवाढ विरोधात काँग्रेसतर्फे  अायोजित सायकल रॅलीत सहभागी झालेले कार्यकर्ते

Web Title: Cycle rally by Congress against fuel price hike