येवल्यात सायकल स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 11:26 PM2020-02-23T23:26:07+5:302020-02-24T00:50:58+5:30

येवला : पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी विकास बहुद्देशीय सेवाभावी संस्था, जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय नाशिक, शिवजयंती उत्सव समिती ...

Cycle competition in coming | येवल्यात सायकल स्पर्धा

येवल्यात सायकल स्पर्धा

googlenewsNext
ठळक मुद्देपर्यावरण रक्षण : सायकलिस्ट फाउण्डेशनचा उपक्रम

येवला : पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी विकास बहुद्देशीय सेवाभावी संस्था, जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय नाशिक, शिवजयंती उत्सव समिती आणि येवला सायकलिस्ट फाउण्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय सायकल स्पर्धा पार पडली.
स्पर्धेत पुरु ष गटासाठी २० किमी, तर महिलांसाठी १० किमी अंतर ठेवण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मारोतराव पवार, माजी नगरसेवक सुभाष पहिलवान पाटोळे, अर्जुन कोकाटे, संजू शिंदे, अविनाश शिंदे, राहुल लोणारी, येवला सायकलिस्ट फाउण्डेशनचे राकेश भांबारे, राजेंद्र कोटमे, स्वप्निल बाकळे, नीलेश शुळ, सचिन सोनवणे, वचन माळी, भाजपचे माजी शहराध्यक्ष आनंद शिंदे, किरण परदेशी, धीरज परदेशी, नानासाहेब लहरे, अक्षय तांदळे, नगरसेवक डॉ. संकेत शिंदे, अर्जुन कोकाटे यांनी विजयी स्पर्धकांचा गौरव केला. विजयी स्पर्धक प्रांजल पाटोळे, पूजा काळे, उज्ज्वला भाटे, यशबनी गुप्ता, गायत्री रसाळ, यशपाल गिरासे, किशोर डुंबरे, सागर पवार, गौरव कुंभारकर, वैभव मोरे, अरु ण थोरे, योगेश माळोकर, अब्दुल सत्तार यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. स्पर्धेसाठी माणिकराव शिंदे, उज्ज्वल पावटेकर, आलमगीर शेठ यांनी सहकार्य केले. अजहर शाह व संजू शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी मुश्ताक मन्सुरी, अश्विनी जगदाळे, कविता माळी, सुलताना शेख, आफरीन शेख, आयशा अन्सारी, इशरत खान, नुसरत खान, बख्तीयार शेख आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Cycle competition in coming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.