मोकभणगी येथे सायकल वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 13:30 IST2020-03-17T13:30:21+5:302020-03-17T13:30:45+5:30
कळवण : मोकभणगी येथील महात्मा फुले हायस्कूल मधील विद्यार्थिनींना मविप्रचे संचालक अशोक पवार यांच्या हस्ते सायकलीचे वाटप करण्यात आले.

मोकभणगी येथील महात्मा फुले हायस्कूल मधील विद्यार्थिनींना सायकल वाटप करताना अशोक पवार पांडुरंग पाटील, दादाजी पाटील,कौतिक पवार, बाळासाहेब शेवाळे,यादवराव शेवाळे, गंगाधर मोरे,
ठळक मुद्देमानव विकास कार्यक्र मातर्गत तीन किलोमीटर किंवा त्याहून जास्त अंतर पायी शाळेत येणाऱ्या विद्यार्थीनींना मोफत सायकल देण्याचा राज्य सरकारचा निर्णय असून शाळेतील१२ विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले.
यावेळी मविप्र समाज संचालक अशोक पवार शालेय समिती अध्यक्ष पांडुरंग पाटील, दादाजी पाटील,कौतिक पवार, बाळासाहेब शेवाळे,यादवराव शेवाळे, गंगाधर मोरे, कलाबाई शेवाळे मुख्याध्यापक बी. ए. निकम आदि उपस्थित होते.