सराईत गुन्हेगाराकडून गावठी कट्ट्यासह काडतुसे जप्त
By Admin | Updated: June 11, 2017 00:45 IST2017-06-11T00:45:45+5:302017-06-11T00:45:56+5:30
नाशिक : गावठी कट्टा व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी आलेला सराईत गुन्हेगार दिलीप हंबिले याच्यासह चौघा संशयितांना म्हसरूळ पोलिसांनी अटक केली आहे़

सराईत गुन्हेगाराकडून गावठी कट्ट्यासह काडतुसे जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : म्हसरूळ परिसरात गावठी कट्टा व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी आलेला सराईत गुन्हेगार दिलीप हंबिले याच्यासह चौघा संशयितांना म्हसरूळ पोलिसांनी अटक केली आहे़ त्यांच्याकडून सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एक संशयित ओडिशा राज्यातील आहे़
सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून संशयितांची रिक्षा (एमएच १५, झेड २९१६) अडविली़ यामध्ये सराईत गुन्हेगार दिलीप तुळशीराम हंबिले (३१, रा़ साईनगर), करण विश्वंभर माजी (२६, रा़ मूळ ओडिशा), रामेश्वर शंकर कुमावत (३२, जेलरोड) व किशोर देवीदास चव्हाण (३०, पंचवटी) बसलेले होते़
या चौघांचीही झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे देशी बनावटीचा कट्टा, पाच जिवंत काडतुसे, एक चॉपर असा १ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला़ याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.