शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

मनमाडच्या भालूर बंधाऱ्याला गळतीचा ‘शाप’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:20 IST

मनमाड : भालूर परिसरात हरितक्रांती घडवून आणणाºया गावाच्या पश्चिम शिवारातील बंधाºयाच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी वर्गाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनेक समस्यांचा सामना करणारा हा बंधारा भरल्यानंतर सांडव्यातून होणाºया गळतीमुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असतो.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : नागरिक करीत आहेत दोन वर्षांपासून दुरुस्तीची तक्रार

गिरीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : भालूर परिसरात हरितक्रांती घडवून आणणाºया गावाच्या पश्चिम शिवारातील बंधाºयाच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी वर्गाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनेक समस्यांचा सामना करणारा हा बंधारा भरल्यानंतर सांडव्यातून होणाºया गळतीमुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असतो.भालूर गावाच्या पश्चिम शिवारात १९७२ च्या दरम्यान बांधण्यात आलेल्या धरणातून रब्बी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन मिळत असल्याने परिसरात हरितक्रांती झाली आहे. या धरणाची क्षमता ४८.१२ दलघफू असून, मृत पाणीसाठा ७.१४ दलघफू शिल्लक राहतो. रब्बी हंगामामध्ये देण्यात येणाºया पाण्याच्या रोटेशनमुळे परिसरात गहू, हरबरा, कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परिसरातील पाचशे ते साडेपाचशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत असते. या धरणाखाली असलेल्या विहिरीवरून जलवाहिनीद्वारे भालूर गावाला पाणीपुरवठा करण्यात येतो. धरण कोरडे झाल्यानंतर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम या विहिरीच्या पाण्यावर होत असतो. उन्हाळ्यात परिसरातील शेतकऱ्यांची जनावरे या धरणावर पाणी पिण्यासाठी येत असतात.परिसरातील शेतकºयांच्या दारी समृद्धी आणणाºया या बंधाºयाची दुरुस्ती व देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. मायनर टॅँकच्या सांडव्याच्या भिंतीला मोठ्या भेगा पडल्या असून, बंधारा भरल्यानंतर या भिंतीमधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असते. रब्बी हंगामात सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता असताना गळतीमुळे पाण्याचा अपव्यय होऊन सिंचनाच्या पाण्यावर परिणाम होतो. पाटाचे पाणी शाकंबरी नदीच्या पलीकडे नेण्यासाठी नदीवर पूल बांधण्यात आला आहे; मात्र या पुरातन पुलाची अवस्था बिकट झाली असल्याने पाण्याची गळती होत असते. पुलाला अनेक ठिकाणी तडे गेले असून, या पुलावरून पाटाचे पाणी जात असताना पाणी वाया जाते. बंधाºयाकडे जाणाºया रस्त्यावर पाटाच्या पाण्यासाठी मोºया बांधण्यात आल्या आहे; मात्र अनेक ठिकाणी या मोºया तुटल्या असून, त्यांची दुरवस्था झाली आहे.(उद्या : औंदाणे)ााटबंधारे विभागाचे दुर्लक्ष१९७२ साली बांधण्यात आलेल्या या बंधाºयाची नैसर्गिकरीत्या झीज होऊ नये यासाठी पाटबंधारे विभागाकडून दगडाची पिंचिंग करून बंधाºयाला संरक्षित करण्यात आले आहे; मात्र अनेक वर्षांचा कालावधी उलटला असल्याने काही ठिकाणी दगडांची पिंचिंग उखडली असल्याने मातीची झीज झाली आहे. धरणाच्या पिंचिंगची दुरुस्ती करण्यात यावी या विषयावर ग्रामपंचायतीकडून ठराव करून तक्रार करण्यात आली होती; मात्र त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून बंधाºयाच्या दुरवस्थेबाबत वारंवार तक्रारी करूनही पाटबंधारे विभागाच्या बेजबाबदारपणामुळे बंधाºयाची परिस्थिती जैसे थे अशीच आहे. याबाबत गांभीर्याने दखल घेऊन दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.