नाशिकरोडला स्वागतयात्रांचा सांस्कृ तिक सोहळा
By Admin | Updated: March 28, 2017 23:41 IST2017-03-28T23:40:43+5:302017-03-28T23:41:25+5:30
नाशिकरोड : गुढीपाडवा सणानिमित्त हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नाशिकरोड व जेलरोड भागातून हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने काढण्यात आलेली नववर्ष स्वागतयात्रा उत्साहात पार पडली.

नाशिकरोडला स्वागतयात्रांचा सांस्कृ तिक सोहळा
नाशिकरोड : गुढीपाडवा सणानिमित्त हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नाशिकरोड व जेलरोड भागातून हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने काढण्यात आलेली नववर्ष स्वागतयात्रा उत्साहात पार पडली. दत्तमंदिर रोड मनपा शाळा १२५ येथून मंगळवारी सकाळी हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी काढण्यात आलेल्या नववर्ष स्वागत शोभायात्रेच्या अग्रभागी एका वाहनावर गुढी व भारतमातेची प्रतिमा ठेवण्यात आली होती. शोभायात्रा आनंदनगर, जगताप मळा, तरण तलाव, गुरूद्वारा, शिखरेवाडी मैदानापर्यंत काढण्यात आली होती. शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर आदि महापुरुषांचा पेहराव करून मुले-मुली सहभागी झाले होते. तसेच शोभायात्रेतील पुरुष व महिला मराठमोळा पेहराव करत भगवा फेटा बांधून हातात भगवे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. शोभायात्रेचे ठिकठिकाणी रहिवाशांकडून रस्त्यावर पाण्याचा सडा मारून रांगोळ्या काढून व फटाके फोडून स्वागत करण्यात येत होते. शोभायात्रेमध्ये नाना पाटील, गोपाळ लाल, योगेश थत्ते, नगरसेवक संभाजी मोरूस्कर, अंबादास पगारे, संगीता गायकवाड, सीमा ताजणे, किंटीशेठ आनंद, रणजित नगरकर, दीपक साबळे, रवि वैद्य, यतिन मुजुमदार, शैलेश शर्मा, महेश झंवर, शंकर औशिकर, संग्राम फडके, राजेंद्र ताजणे, मंगेश रोडेकर, हेमंत गायकवाड आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)