चांदवडला सलग तिसऱ्या दिवशी कडकोट लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 00:20 IST2020-04-11T20:34:40+5:302020-04-12T00:20:22+5:30
चांदवड : शहरात कोरोनाबाधीत रुग्ण सापडल्याने संपुर्ण परिसर लॉकडाऊन करण्यात येऊन सर्व सीमा सील केल्या आहेत .

चांदवडला सलग तिसऱ्या दिवशी कडकोट लॉकडाऊन
चांदवड : शहरात कोरोनाबाधीत रुग्ण सापडल्याने संपुर्ण परिसर लॉकडाऊन करण्यात येऊन सर्व सीमा सील केल्या आहेत . जीवनावश्यक किराणा , भाजीपाला दुकाने बंद आहेत तर चांदवडचे प्रांताधिकारी गणेश मिसाळ, तहसीलदार प्रदीप पाटील , मुख्याधिकारी अभिजीत कदम यांनी संशयित रुग्णाचा परिसर केंद्रबिंदु मानून तीन किलोमीटरचा परिसर कंटेनमेंट क्षेत्र घोषित केले. तीन किमी अंतरातील परिघाचे क्षेत्र कंटेनमेंट क्षेत्र तर त्यास लागुन क्षेत्र पाच किलोमीटर क्षेत्र हे बफर झोन म्हणून घोषीत केले. अत्यावश्यक सेवा ,किराणा साहित्य व भाजीपाला , दवाखाना, मेडीकल यांची आवश्यकता असल्यास नगरपलिका , आरोग्य यंत्रणेमार्फत त्याचा पुरवठा मागणी प्रमाणे सशुल्क करण्यात येणार आहे.