मालेगावी बाजारपेठेत उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:14 IST2021-05-12T04:14:36+5:302021-05-12T04:14:36+5:30
मालेगाव : अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या रमजान ईद सणाच्या व उद्या (दि. १२)पासून लावण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ...

मालेगावी बाजारपेठेत उसळली गर्दी
मालेगाव : अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या रमजान ईद सणाच्या व उद्या (दि. १२)पासून लावण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी उसळली होती. कोरोना निर्बंधांचे नियम पायदळी तुडवीत बाजारपेठ गर्दीने खचाखच भरली होती. याकडे मात्र स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. कोरोनाचे संकट दिवसागणिक गडद होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतला आहे. बुधवारपासून सलग १२ दिवस नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. किराणा, भाजीपाला व अत्यावश्यक सेवांवरही काही निर्बंध लावण्यात आले आहेत. या भीतीपोटी मंगळवारी शहरातील गूळबाजार, सोमवार बाजार, कॅम्प रोड, एम. जी. मार्केट, सटाणानाका, कॅम्परोडवरील दुकानांमध्ये नागरिकांनी भाजीपाला व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. गूळ बाजारात तर खरेदीसाठी अक्षरश: झुंबड उडाली होती.
-------------------------
नियमांचे उल्लंघन
रमजान ईद अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे मुस्लीम बांधवांनी किदवाई रोड, बापू गांधी मार्केट, अंजूमन चौक या ठिकाणी विविध वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. या काळात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले. फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला होता. बाजारपेठेला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यामुळे कोरोना फैलावण्याची शक्यता आहे. गर्दी नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या स्थानिक प्रशासनाने मात्र याकडे साफ दुर्लक्ष केले होते. दुपारपर्यंत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. दुपारनंतर पोलीस यंत्रणेने गर्दीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला होता.
===Photopath===
110521\11nsk_1_11052021_13.jpg
===Caption===
मालेगावी गुळ बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवून खरेदीसाठी नागरिकांनी केलेली गर्दी.