Crowds of supporters for the release of the gangster | गुंडाच्या सुटकेसाठी समर्थकांची गर्दी

गुंडाच्या सुटकेसाठी समर्थकांची गर्दी

ठळक मुद्देठाण्याहून मोठ्या संख्येने त्याचे समर्थक आले होते.

नाशिकरोड : खंडणी उकळणे, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीररित्या हत्यारे बाळगणे, दहशत निर्माण करणे आदी प्रकरणातील ठाण्यातील कुख्यात गुंड सिध्देश अभंगे याची गुरुवारी सकाळी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली. यावेळी त्याच्या समर्थकांनी मोठी गर्दी केल्याने जेलरोडला वाहतूकीची कोंडी झाली होती.
सिध्देश अभंगे हा राज्यातील मंत्र्याचा व पक्षाचा समर्थक असल्याचे सांगितले जाते. ठाणे पोलिसांनी त्याच्यावर स्थानबध्दतेची कारवाई करत नाशिकरोडच्या कारागृहात 2 आॅक्टोबर 2019 रवानगी केली होती. एक वर्षाचा कालावधी संपल्याने त्याची गुरुवारी सुटका होणार असल्याचे समजताच ठाण्याहून मोठ्या संख्येने त्याचे समर्थक आले होते. अधिक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृह अधिका-यांनी समर्थकांना कारागृह आवारात प्रवेशास प्रतिबंध केला. त्यामुळे जेलरोडवर वाहतूक कोंडी झाली होती. समर्थकांनी फटाखे फोडू नये, शांतता राखावी अशी सूचना करण्यात आली होती.

Web Title: Crowds of supporters for the release of the gangster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.