वणी : दीपावलीनिमित्त मंगळवारी आठवडे बाजारात मोठी आर्थिक उलाढाल झाली. वणी पिंपळगाव रस्त्यावरील बाजारतळात भरणाऱ्या आठवडे बाजारात सकाळपासुन व्यावसायिकांनी आपली दुकाने लावण्यासाठी गर्दी केली होती. येत्या शुक्र वारपासुन दिवाळी सणास प्रारंभ होतो आहे. त्या पाशर््वभूमीवर व्यवसायात मोठी उलाढाल होते. कापड किराणा धान्य दिवाळी फराळाची दुकाने इमीटेशन ज्वेलरी पादत्राणे मसाल्याची तसेच खाद्यपदार्थांची दुकाने धान्यांची दुकाने ज्युस सेंटर भेळभत्ता झाडु विक्र ेतै हे व असे विविध व्यवसाय करणाºया व्यावसायिक यांचेबरोबर फळ व भाजीपाला विक्र ेते मंगळवारच्या आठवडे बाजारात दुकाने लावतात. जिल्हाभरातील व्यावसायिक व्यवसाय करण्यासाठी येतात. वणीच्या आठवडेबाजाराशी सुमारे १०० पेक्षा अधिक गावे खेडे-पाडे यांचा विविध वस्तुंच्या खरेदी विक्र ीच्या माध्यमातुन संबंध येतो. मोठी आर्थिक उलाढाल होते मात्र सण बाजारात तुलनात्मक मोठी आर्थिक उलाढाल होते. मजुर कामगार यांचेबरोबर विविध घटक सण बाजारातुन वस्तु खरेदी करतात. त्यात चायना लाईटिंग, सीडी शोभेच्या वस्तु रांगोळी आकाशकंदील या व अशा अनेक वस्तु शहरातील दुकानापेक्षा स्वस्त मिळतात असे गणित खरेदीदाराचे असते. त्यामुळे सण बाजाराला यात्रेचे स्वरु प येते. दरम्यान किरकोळ तसेच घाऊक व्यावसायिक यांचेमुळे स्पर्धेचे वातावरण तयार होते व यात ग्राहकांचा फायदा होतो. दरम्यान, शहरातील किराणा दुकानातही मोठी आर्थिक उलाढाल झाली. सेल लावलेल्या कापड दुकानातही गर्दी दिसून येत होती.
दीपावलीनिमित्त आठवडे बाजारात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 15:57 IST