जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:14 IST2021-05-12T04:14:39+5:302021-05-12T04:14:39+5:30
सिन्नर : १२ मे पासून संपूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी शहरासह ग्रामीण भागात गर्दी उसळल्याचे ...

जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी उसळली गर्दी
सिन्नर : १२ मे पासून संपूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी शहरासह ग्रामीण भागात गर्दी उसळल्याचे चित्र दिसून आले. नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केल्याने सर्वत्र जमावबंदी, तसेच कोरोनाचे नियम पायदळी तुडविल्याचे चित्र दिसून आले. १२ मे रोजी दुपारी १२ वाजेपासून कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. बुधवारी दुपारी बारा वाजेपर्यंत नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी संधी असताना मंगळवारीच सर्वच नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला होता. किराणा दुकान, भाजीबाजार, पिठाच्या गिरण्या या ठिकाणी कोठेही सामाजिक अंतर पाळले जात नव्हते. पेट्रोल पंपावरही हेच चित्र दिसून आले.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यात सिन्नर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दि. १२ ते २२ मे असे दहा दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तूंसाठी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत असलेला वेळदेखील रद्द करण्यात आला आहे.
----------------
पेट्रोलपंपांवरही गर्दी
पेट्रोल पंपही सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेलसाठी बंद असल्याचे समजल्यानंतर वाहनचालकांनी पेट्रोल-डिझेल खरेदीसाठी एकच झुंबड केली.
मंगळवारी सकाळपासून नागरिकांनी किराणा दुकान, भाजीपाला व दळण दळण्यासाठी गिरण्यांवर प्रचंड गर्दी केली होती. सिन्नर शहरातील किराणा दुकानांमध्ये प्रचंड गर्दी दिसून आली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला होता. दुपारची वेळ संपल्यानंतरही अनेक ठिकाणी दुकाने सुरू होती. गणेशपेठ, सरस्वतीपूल, गांवठा, वावीवेस या भागांत प्रचंड गर्दी दिसून आली. ग्रामीण भागातही किराणा दुकानांमध्ये नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. शहरातील गणेशपेठेत वाहूक कोंडीसह फिजिकल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला. पेट्रोलपंपांवरही रांगा दिसून येत होत्या.
----------------
सिन्नर शहरात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिक दुचाकी घेऊन मोठ्या संख्येने बाहेर पडले होते. शहरात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांची उडाली झुंबड. (११ सिन्नर १/२/३)
===Photopath===
110521\11nsk_8_11052021_13.jpg
===Caption===
११ सिन्नर १/२/३