सप्तश्रृंगगडावर भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 14:21 IST2019-10-07T14:21:35+5:302019-10-07T14:21:49+5:30
पांडाणे : गडावरील सप्तशृंगीमातेची नवव्या माळेची महापुजा सोमवारी मुंबई येथील संजीव प्रभाकर सरनाईक व मेघा बर्डे पवार व सहपरिवार यांच्या हस्ते करण्यात आली.

सप्तश्रृंगगडावर भाविकांची गर्दी
पांडाणे : गडावरील सप्तशृंगीमातेची नवव्या माळेची महापुजा सोमवारी मुंबई येथील संजीव प्रभाकर सरनाईक व मेघा बर्डे पवार व सहपरिवार यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी नववी माळ असल्यामुळे पुजारी दिंगबर भोये , गोविंद केवारे ,नाना गांगर्डे ,प्रकाश कनोज विश्वनाथ बर्डे ,गौरव देशमुख यांनी आरती केली. सोमवारच्या आरतीला न्यासाचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे , कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे , सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके , उपसरपंच राजेंद्र गवळी , प्रशांत निकम , किरण राजपूत आदी उपस्थित महाआरती करण्यात आली. नवमीच्या दिवशी शतचंडी होमाला करण्यात आला. यावेळी यागाला न्यासाचे अध्यक्ष गणेश देशमुख, अँड अविनाश भिडे ,रावसाहेब शिंदे , अड उन्मेश गायधनी , विश्वस्त राजेद्र सुर्यवशी , व माजी विश्वस्त सर्वच विश्वस्त उपस्थित होते. नवमी असल्यामुळे किर्ती ध्वजाची तिन वाजता महापुजा करण्यास सुरवात होत या महापुजेला दरेगाव ता कळवण येथील गवळी समाजाच्या बांधवाना बोलवून किर्ती ध्वजाची पुजा न्यासाचे अध्यक्ष गणेश सुर्यवंशी यांच्या हस्ते होवून किर्ती ध्वजची मोठी मिरवणूक काढून रात्री किर्ती ध्वज देविच्या गडाच्या शिखरावर तो फडकवला जातो .