येवल्यात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 18:19 IST2021-05-24T18:19:05+5:302021-05-24T18:19:26+5:30

महामार्गावर भाजीपाला फळे खरेदीसाठीही सकाळी गर्दी

Crowds of citizens shopping in Yeola | येवल्यात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी

येवल्यात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी

येवला : वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू असणाऱ्या कठोर निर्बंधात शिथिलता जाहीर होताच पहिल्याच दिवशी येवला बाजारात सकाळपासूनच गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. ग्रामीण भागातून शेतकरी वर्गाची शेती उपयोगी साहित्य, प्लास्टिक खरेदीसाठी ही मोठी गर्दी झाली होती. शहरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र होते. तर महामार्गावर भाजीपाला फळे खरेदीसाठीही सकाळी गर्दी दिसून आली. या गर्दीत सोशल डिस्टंसिंगचा मात्र फज्जा उडाला होता.

 

Web Title: Crowds of citizens shopping in Yeola