शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

रामशेज किल्ल्यावर पर्यटकांचा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 5:34 PM

लखमापूर : जिल्ह्यातील पर्यटनस्थळ परीसरात पोलिस बंदोबस्त तैनात केलेला असताना हे सर्व आदेश,नियम धाब्यावर बसवून असंख्य नागरीक शनिवार, रविवारी सुट्यांमुळे कोणतीही खबरदारी न घेता जीवाची मौज करण्याकरीता धरण, धबधबे, किल्ले टेकड्या आदी प्रेक्षणीय स्थळांकडे धावल्याने अश्या भागात पर्यटकांचा महापूर उसळला होता. त्यामुळे प्रशासन, पोलिस यंत्रणा देखिल हतबल झाल्याचे चित्र दिसत होते.

ठळक मुद्देलखमापूर : शासन अन‌् प्रशासनाचे निर्बंध धाब्यावर बसविले संताप

लखमापूर : जिल्ह्यातील पर्यटनस्थळ परीसरात पोलिस बंदोबस्त तैनात केलेला असताना हे सर्व आदेश,नियम धाब्यावर बसवून असंख्य नागरीक शनिवार, रविवारी सुट्यांमुळे कोणतीही खबरदारी न घेता जीवाची मौज करण्याकरीता धरण, धबधबे, किल्ले टेकड्या आदी प्रेक्षणीय स्थळांकडे धावल्याने अश्या भागात पर्यटकांचा महापूर उसळला होता. त्यामुळे प्रशासन, पोलिस यंत्रणा देखिल हतबल झाल्याचे चित्र दिसत होते.

दिंडोरी तालुक्यातील किल्ले रामशेज किल्ला परीसरात शनिवारी व रविवारी पर्यटकांची बेसुमार गर्दी दिसून आली. अनेकजण या ठिकाणी मनमुराद भटकत असल्याने त्यानंतर वनविभाग दिंडोरी, पोलीस यंत्रणा व स्थानिक गावाचे दुर्लक्ष असल्याने किल्ल्यावर बेसुमार प्लास्टिक कचऱ्याचे ढीग झाले आहेत. बेशिस्त पर्यटक व हुल्लडबाज, व्यसनी, उपद्रवी मंडळींमुळे कोरोना काळात मोठ्या कष्टाने दुर्गसंवर्धनातून वाचवलेल्या ऐतिहासिक वास्तूंना, येथील पर्यावरणाला धोका पोहोचवला जात आहे.या संदर्भात वनविभाग, पोलीस, गाव प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करूनही संबंधितांकडून हलगर्जीपणा, दुर्लक्ष केल जात आहे. दरम्यान एकीकडे दुर्गांचे अस्तित्व वाचवण्यासाठी दुर्गसंवर्धन संस्था जीवापाड राबतात, मात्र त्याच दुर्गांचे उरलेसुरले अस्तित्व संपवण्याचे प्रकार डोळ्यासमोर घडत आहे. हयाबाबत शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, पर्यावरण टास्क फोर्स च्यावतीने पुन्हा पत्रव्यवहार केला जाणार असल्याचे गडप्रेमींनी सांगितले. कोरोनाच्या स्थितीत किल्ल्यावर होणारी गर्दी, गावाला संसर्ग पोहोचवणारी आहे. किल्ल्यावर बेसुमार प्लास्टिक कचरा वाढला आहे, यासंदर्भात उपवनसंरक्षक पूर्व वनविभाग, दिंडोरी वनविभाग, जिल्हा पोलीस प्रशासन अंतर्गत दिंडोरी पोलीस, स्थानिक गाव यांनी कोरोनाच्या स्थितीत पर्यटन संदर्भात शासकीय आदेश पाळावा व किल्ल्याचे अस्तित्व वाचवण्यासाठी किल्ल्याच्या पायथ्याशी नोंदणी, तपासणी चौकी उभारावी अशी मागणी दुर्गप्रेमींकडून करण्यात आली आहे.पर्यटन बंदी असताना....रामशेज किल्ल्यावर पर्यटकांना जाण्यास मनाई असताना देखील वनविभाग व स्थानिक ग्रामपंचायत यांची भूमिका संशयास्पद दिसते. आशेवाडी ग्रामपंचायतीने येणाऱ्या पर्यटकांकडून वाहनतळाच्या नावाखाली बेकायदेशीर वसुली सुरू ठेवली असून यातून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटन बंदी केलेली असताना आशेवाडी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. संबंधित पार्किंग ठेकेदार पर्यटकांकडून अव्वाच्या सव्वा दराने पार्किंग चार्ज वसूल करीत आहेत. त्याची चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे.चाकट...नियम फक्त कागदावरच...रामशेज किल्ल्यावर होणारी पर्यटकांची गर्दी बघता पर्यटन बंदी कागदावरच दिसून येत आहे. बेशिस्त पर्यटकांमुळे किल्ल्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. स्थानिक ग्रामपंचायत व वनविभागाकडून पर्यटकांना कुठलाही अटकाव केला जात नाही. बेशिस्त पर्यटक व हुल्लडबाजी यामुळे गडाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याठिकाणी तपासणी चौकी भरण्यात यावी. (२७ लखमापूर १,२,३) 

टॅग्स :SocialसामाजिकFordफोर्ड