दुर्गम भागातून मोर्चासाठी गर्दी

By Admin | Updated: October 3, 2016 23:55 IST2016-10-03T22:39:45+5:302016-10-03T23:55:57+5:30

दुर्गम भागातून मोर्चासाठी गर्दी

The crowd for a ramp from the remote part | दुर्गम भागातून मोर्चासाठी गर्दी

दुर्गम भागातून मोर्चासाठी गर्दी

बेलगाव कुऱ्हे : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ नाशिक येथे आयोजित मोर्चात इगतपुरी तालुक्यातून ओबीसी समाजातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. तालुक्याच्या दुर्गम भागातून मोर्चासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नाशिक तपोवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चाला इगतपुरीवासीयांनी हजेरी लावली होती. या मोर्चात कुंभमेळ्यासारखी गर्दी पाहावयास मिळाली. भुजबळ समर्थकांचा मोर्चा असल्याचे संयोजक दिलीप खैरे यांनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चाचे नियोजन होते. तालुक्याच्या वतीने समता परिषदेचे तालुकाध्यक्ष शिवा काळे यांनी नियोजन केले होते. (वार्ताहर)

Web Title: The crowd for a ramp from the remote part