गोदाकाठ परिसरात पेट्रोल पंपांवर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 00:46 IST2021-05-11T22:31:10+5:302021-05-12T00:46:55+5:30
चांदोरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात टाळेबंदीचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला असता त्यांचे पडसाद ग्रामीण भागात देखील उमटले आहे.

गोदाकाठ परिसरात पेट्रोल पंपांवर गर्दी
ठळक मुद्दे भाजीपाला घेण्यासाठी देखील नागरिकांनी गर्दी
चांदोरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात टाळेबंदीचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला असता त्यांचे पडसाद ग्रामीण भागात देखील उमटले आहे.
गोदाकाठच्या नागरिकांनी किराणा दुकान, पीठाची गिरणी आदी दुकानात गर्दी केली होती. अनेक गावात भाजीपाला घेण्यासाठी देखील नागरिकांनी गर्दी केली होती. जिल्हा प्रशासनाने फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांना पेट्रोल दिले जाईल असा आदेश काढताच नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी एकच गर्दी केल्याने पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.