ब्राह्मणगावी भाजीपाला घेण्यासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 00:37 IST2021-05-11T16:33:41+5:302021-05-12T00:37:44+5:30
ब्राह्मणगाव : जिल्ह्यात मंगळवारपासून लागणाऱ्या कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे मंगळवारी सकाळी येथील बाजार चौकात भाजीपाला घेण्यासाठी व किराणा बाजार घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. शुक्रवारी अक्षय तृतीया असल्याने पुन्हा किराणा बाजार करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.

ब्राह्मणगावी भाजीपाला घेण्यासाठी गर्दी
ठळक मुद्दे नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे
ब्राह्मणगाव : जिल्ह्यात मंगळवारपासून लागणाऱ्या कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे मंगळवारी सकाळी येथील बाजार चौकात भाजीपाला घेण्यासाठी व किराणा बाजार घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. शुक्रवारी अक्षय तृतीया असल्याने पुन्हा किराणा बाजार करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.
पोलीस प्रशासन आपल्या परीने कामकाज करत असले तरी नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. सध्या कोविड लसीकरणाची सध्या बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याने संसर्गाची भीती वाढली आहे. (११ ब्राह्मणगाव)