सय्यदवली यात्रेतील कुस्त्यांना गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 21:04 IST2019-04-27T21:03:25+5:302019-04-27T21:04:50+5:30
अंदरसुल : येथील सर्वधर्मीय स्थान सय्यदवली दोन दिवशीय यात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

सय्यदवली यात्रेतील कुस्त्यांना गर्दी
अंदरसुल : येथील सर्वधर्मीय स्थान सय्यदवली दोन दिवशीय यात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
गुरु वारी (दि.२५) सकाळी सय्यदवली स्थानावर चादर टाकण्याचा कार्यक्र म हिंदू व मुस्लिम बांधवांनी गावातील सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत झाला. त्या निमित्ताने गावाचा आठवडे बाजार या परिसरात भरविला जातो दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.२६) सायंकाळी पाच वाजता भव्य कुस्त्यांची दंगल झाली. या कुस्तीच्या फडात नासिक, नगर, औरंगाबाद जिल्ह्यातील कुस्तीपटूंनी हजेरी लावली. गावातील सर्व नागरिक तसेच कुस्ती शौकीन उत्साहाने या सोहळ्यात सहभागी झाले होते.
अंदरसुलचे माजी सरपंच जगनाथ पाटील जगताप, मारु ती वाकचौरे, कुस्तीपटू पंडित मेहकर, शिवाजी पहिलवान धनगे आदींनी साहळा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.