विंध्यवासिनी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 01:52 IST2018-10-19T01:50:58+5:302018-10-19T01:52:03+5:30

नवरात्रोत्सवानिमित्त येथील विंध्यवासिनी मातेच्या मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. दसऱ्याला दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

The crowd of devotees for Vindhyaswini Mata's darshan | विंध्यवासिनी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

विंध्यवासिनी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

दिंडोरी : नवरात्रोत्सवानिमित्त येथील विंध्यवासिनी मातेच्या मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. दसऱ्याला दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
दिंडोरी शहरापासून जवळच असलेल्या विंध्यवासिनी डोंगरावर पुरातन विंध्यवासिनी मंदिर असून, नुकतेच तेथे मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. डोंगरावर जाण्यास डांबरी रस्ता असून, वाहने डोंगरावर नेण्याचीही सोय आहे. श्री विंध्यवासिनी ट्रस्ट व श्री विंध्यवासीनी माता उत्सव समितीतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत दर्शनाचा लाभ घेतला.

Web Title: The crowd of devotees for Vindhyaswini Mata's darshan