अन्नपूर्णामातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:19 IST2018-02-27T00:19:07+5:302018-02-27T00:19:07+5:30

येथे सुरू असलेला व निलपर्वतावर स्थापित झालेल्या अन्नपूर्णामाता मंदिर परिसरात सुरू असलेल्या शतकुंडीय हवनात्मक लक्षचंडी महायज्ञामध्ये आतापर्यंत सहा लाखातून अधिक आहुती देण्यात आल्या.

 A crowd of devotees for the show of Annapurnamata | अन्नपूर्णामातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

अन्नपूर्णामातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

त्र्यंबकेश्वर : येथे सुरू असलेला व निलपर्वतावर स्थापित झालेल्या अन्नपूर्णामाता मंदिर परिसरात सुरू असलेल्या शतकुंडीय हवनात्मक लक्षचंडी महायज्ञामध्ये आतापर्यंत सहा लाखातून अधिक आहुती देण्यात आल्या. यज्ञाच्या सांगतेपर्यंत (दि. २८) एकूण नऊ लाख आहुती दिल्या जाणार असल्याची माहिती यज्ञाचार्य पंडित कल्याण दत्तशास्त्री, इंदूर यांनी दिली. दरम्यान, अन्नपूर्णामातेचे  दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.  यज्ञाच्या महत्त्वाबाबत सांगताना कल्याण दत्तशास्त्री म्हणाले, शास्त्रानुसार यज्ञाचे मोठे महत्त्व आहे. यज्ञामुळे पर्यावरण शुद्धी होऊन त्यामुळे चांगला पाऊस पडतो. चांगल्या पावसाने शेतात अन्नधान्यांची निर्मिती होऊन सर्व प्राणिमात्रांचे जीवन चालते. यज्ञ हे भगवान विष्णूचे एक रूप असून, उपनिषदानुसार यज्ञ न करणारा तेजहीन होतो. वायुप्रदूषण कमी करण्यास यज्ञ हे एक महत्त्वाचे साधन असून, त्र्यंबकेश्वर येथे होणार हा महायज्ञ सर्वांच्या कल्याणासाठी करण्यात येत आहे.  भारताच्या विविध भागातून आलेले १०० यजमान सिद्धपीठ श्री अन्नपूर्णा आश्रम चॅरिटेबल ट्रस्टचे महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी महाराज व देशातील ६२५ पंडितांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञात सहभागी झाली आहेत. पूर्णपणे शास्त्रानुसार उभारण्यात आलेल्या ३२ हजार चौरस फूट एवढ्या भव्य यज्ञशाळेत १०० कुंडांमध्ये यज्ञात आहुती देत आहेत.  गेल्या दहा दिवसांपासून अन्नपूर्णामातेचा अन्नदान भंडारा अव्याहत सुरू असुन सकाळ दुपार संध्यकाळ या परिसरातून नागरिक प्रसाद भोजन ग्रहणासाठी येत असतात.

Web Title:  A crowd of devotees for the show of Annapurnamata

टॅग्स :Nashikनाशिक