निफाडला भाजीपाला खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 16:29 IST2021-05-11T16:29:24+5:302021-05-11T16:29:46+5:30

निफाड : बुधवारपासून कडकडीत लॉकडाऊन लागू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर निफाड येथे नागरिकांनी भाजीपाला खरेदीसाठी गर्दी केली होती.

Crowd to buy Nifadla vegetables | निफाडला भाजीपाला खरेदीसाठी गर्दी

निफाडला भाजीपाला खरेदीसाठी गर्दी

ठळक मुद्देखरेदी करताना फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाला

निफाड : बुधवारपासून कडकडीत लॉकडाऊन लागू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर निफाड येथे नागरिकांनी भाजीपाला खरेदीसाठी गर्दी केली होती.

उगावरोड, भाजीमार्केट या भागात भाजीपाला विक्रेते बसले होते. कोरोनाचे गांभीर्य असतानाही भाजीपाला खरेदीसाठी लोकांनी गर्दी केली होती. सकाळी ७ ते ११ या वेळेत खरेदी करण्याची वेळ होती. खरेदी करताना फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता. दि. २२ पर्यंत लॉकडाऊन असल्याने नागरिकांचा जास्त प्रमाणात भाजीपाला खरेदी करण्याकडे कल होता. किराणा माल खरेदी करताना किराणा दुकानाबाहेर ग्राहकांची गर्दी असली तरी बहुतेक किराणा दुकानात खरेदीसाठी ग्राहक अंतर ठेवून उभे होते.

Web Title: Crowd to buy Nifadla vegetables