पेठ : गुजरात महामार्गावरील चौफूलीवर रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 13:10 IST2020-12-08T13:08:46+5:302020-12-08T13:10:15+5:30

नाशिक : शेतकरी आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पेठ शहर व तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले तर ...

On the crossroads of Gujarat National Highway | पेठ : गुजरात महामार्गावरील चौफूलीवर रास्ता रोको

पेठ : गुजरात महामार्गावरील चौफूलीवर रास्ता रोको

ठळक मुद्देबंदला संमिश्र प्रतिसादबाजारपेठेत शुकशुकाट

नाशिक : शेतकरी आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पेठ शहर व तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले तर माकपा व किसान सभेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करत भारत बंदला पाठींबा दर्शवला.
सकाळ पासूनच शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. गुजरात राष्ट्रीय महामार्गावरील चौफूलीवर पेठ तालुका किसान सभा, माकपा, शिवसेना, राष्ट्रवादी व कॉग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने रास्ता रोको आंदोलन करत भारत बंदला पाठिंबा दर्शवला. यावेळी डीवायएफआय चे जिल्हाध्यक्ष कॉ. इंद्रजीत गावीत, तालुकाध्यक्ष कॉ. देवराम गायकवाड, मनोज घोंगे, दामू राऊत, विशाल जाधव, याकूब शेख, कांतीलाल राऊत, गिरीश गावीत सचिव कॉ. नामदेव मोहांडकर, कॉ. महेश टोपले, कॉ. जाकीर मनियार,यांचेसह शेतकरी, कामगार, शेतमजूर सहभागी झाले होते.पेठ पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Web Title: On the crossroads of Gujarat National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.