क्र ीडाशिक्षकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:10 IST2017-08-05T23:54:28+5:302017-08-06T00:10:05+5:30
महाराष्ट्र शासनाच्या शालेय क्र ीडा व शिक्षण विभागाने कला, क्र ीडा व कार्यानुभव विषयांच्या तासिका (भारांश) निम्म्याने कमी केल्याच्या निषेधार्थ राज्यातील सर्व माध्यमिक शाळांमधील क्रीडाशिक्षकांमध्ये शासनाच्या या धोरणाबाबत संतापाची भावना पसरली आहे.

क्र ीडाशिक्षकांचे आंदोलन
येवला : महाराष्ट्र शासनाच्या शालेय क्र ीडा व शिक्षण विभागाने कला, क्र ीडा व कार्यानुभव विषयांच्या तासिका (भारांश) निम्म्याने कमी केल्याच्या निषेधार्थ राज्यातील सर्व माध्यमिक शाळांमधील क्रीडाशिक्षकांमध्ये शासनाच्या या धोरणाबाबत संतापाची भावना पसरली आहे. यामुळे दरवर्षी मोठ्या उत्साहात होणाºया शालेय क्रीडा स्पर्धेवर यंदा क्रीडाशिक्षकांनी बहिष्कार टाकला आहे. क्र ीडा तासिका पूर्ववत केल्याशिवाय येवल्यासह राज्यात शालेय क्रीडा स्पर्धा घेणार नसल्याचे निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. येवला तालुका क्रीडाशिक्षक संघटनेच्या शिक्षकांनी येथील तहसील कार्यालयावर एक दिवसाचे धरणे धरले आणि शासनाच्या क्रीडाविषयक धोरणाचा निषेध केला. तहसीलदार यांच्या नवे असणारे निवेदन नायब तहसीलदार सविता पठारे यांनी स्वीकारले. क्रीडाशिक्षकांच्या येवल्याच्या शिष्टमंडळाने जिल्हा क्र ीडा अधिकारी नाशिक यांना भेटून हे निवेदन दिले आहे. तहसील आवारात क्रीडाशिक्षकांनी न्याय मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. संबंधिताना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यशपाल कमिटीने क्रीडाशिक्षकाला आठवड्याला पाच तासिका वाढवाव्यात, अशी शिफारस केलेली असताना शिक्षण खात्याने शिफारस मान्य करण्याऐवजी क्रीडाशिक्षकांचा कार्यभार निम्म्याने कमी करून अन्याय केला आहे. यशपाल कमिटीच्या शिफारशीला केराची टोपली शासनाने दाखवली आहे. क्रीडाशिक्षकांचा कार्यभार पूर्ववत करावा, अशी आग्रही मागणी आहे. अन्यथा शालेय क्र ीडा स्पर्धासह वन मिलिअन फुटबॉल स्पर्धासह सर्व स्पर्धांवर बहिष्कार कायम असल्याचे निवेदनात म्हटले आहे. धरणे आंदोलनात शिरीष नांदुर्डीकर, अरुण गायकवाड, साहेबराव घुगे, आनंदा वैद्य, विजय अहिरराव, नवनाथ उंडे, रामदास महाले, अरु ण विभुते, मुरलीधर पहिलवान, चांगदेव खैरे, सागर लोणारी, भाऊसाहेब गाढे सहभागी झाले होते.