आलोचना, विश्वमैत्री, क्षमापना म्हणजेच संवत्सरी पर्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 01:05 IST2018-09-14T01:04:58+5:302018-09-14T01:05:04+5:30
संवत्सरी पर्व म्हणजेच आलोचना, विश्वमैत्री, क्षमापना होय. तसेच आत्म्याचा व गुरुंनी ज्ञानार्जन करण्याचा उत्सव आहे. वात्सल्याचा सागर, सगळ्या पर्वांचा राजा म्हणजे हे महापर्व होय. असा सूर पर्यूषण महापर्वाच्या सांगता उत्सवात उमटला.

आलोचना, विश्वमैत्री, क्षमापना म्हणजेच संवत्सरी पर्व
नाशिक : संवत्सरी पर्व म्हणजेच आलोचना, विश्वमैत्री, क्षमापना होय. तसेच आत्म्याचा व गुरुंनी ज्ञानार्जन करण्याचा उत्सव आहे. वात्सल्याचा सागर, सगळ्या पर्वांचा राजा म्हणजे हे महापर्व होय. असा सूर पर्यूषण महापर्वाच्या सांगता उत्सवात उमटला.
प्रवचन प्रभाविका सुशीलाजी म.सा., आगमश्रीजी म.सा., चैतन्यश्रीजी म.सा., सुबोधिजी म.सा., जयश्रीजी म.सा., जिज्ञासाजी म.सा., प्रबोधिजी म.सा. आदी सात के सानिध्यमे पर्यूषण महापर्व गंगापूररोडवरील चोपडा लॉन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी सुशीलाजी म.सा. यांनी संबोधित करताना म्हटले की, पर्यूषणाचा आठवा दिवस हा दिव्याने सजवण्याचा दिवाळीप्रमाणे सण आहे. संवत्सरी म्हणजे एक नदी जेव्हा दुसऱ्या नदीला जाऊन मिळते तेव्हा त्याचे समुद्रात रूपांतर होते. विटांवर विटा रचल्यानंतरच मंदिर बनते. प्रत्येकाला एकमेकाला भेटण्याचा
व क्षमायाचना करण्याचा हा सण आहे.
पर्यूषण पर्व यशस्वी संपन्न करण्यासाठी संघपती राजमल भंडारी, महामंत्री सुभाष लोढा, धार्मिक सेक्रेटरी पंकज श्यामसुका, विजय कोठारी, पारस साखला, जयप्रकाश लुणावत, नंदलाल पारख, विजय ब्रह्मेचा, मोहन लोढा, संगीता सुराणा, शांतीलाल हिरण, सागर भटेवरा, स्वागत कमिटी अध्यक्ष शारदा भंडारी, भोजन कमिटी अध्यक्ष हरीश खटोड, माणक भंडारी, आनंद खिवसरा, समन्वयक नीलेश भंडारी, सुशील बहुमंडळ, उपासिका बहुमंडळ, नवकार ग्रुप, शांतीजा ग्रुप यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमासाठी सुभाष भंडारी, प्रमोद कांकरिया, वर्षा छाजेड यांचे सहकार्य लाभले. यावेळी कार्यक्रमास अशोक कटारिया, सोहन भंडारी, हरिश लोढा, विजय बेदमुथा, अंबालाल नहार, अशोका बिल्डकॉनचे सतीश पारख, कांतिलाल चोपडा, अशिष नहार, भवरसिंग पारख, सुनील बुरड, सुरेश भटेवरा, चंद्रकांत पारख, अजय मंचरकर आदी श्रावक व श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.