भात पिकांवर करपा रोगाचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 17:00 IST2020-09-13T16:59:06+5:302020-09-13T17:00:01+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या अस्वली, नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे, नांदगाव बुद्रुक, देवळे, पिंपळगाव मोर, धामणी, धामणगाव, टाकेद, अडसरे, घोडेवाडी, बांबळेवाडी, खेड आदीं परिसरातील भात शेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने येथील भात उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

भात पिकांवर करपा रोगाचे संकट
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या अस्वली, नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे, नांदगाव बुद्रुक, देवळे, पिंपळगाव मोर, धामणी, धामणगाव, टाकेद, अडसरे, घोडेवाडी, बांबळेवाडी, खेड आदीं परिसरातील भात शेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने येथील भात उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
यावर्षी सुरु वातीला पाऊस न झाल्याने अनेक शेतकऱ्यांची भात रोपे खराब होऊन वाया गेली असून नंतर पाऊस सुरू झाला परंतू अचानक कमी कालावधीत प्रचंड पाऊस झाल्याने अतिशय कमी वेळेत शेतकºयांनी भात लागवड केली. यावेळीही जास्त पाण्यामुळे भात शेतीची नुकसान झाली आणि आता शेतकºयांनी इंद्रायणी, १००८, पूनम, सोनम, ओम श्री राम, गरे, हाळे, आर चोवीस, रु पाली अशा विविध भाताच्या वाणांची लागवड केली आहे.
मात्र काही दिवसांपासून लागवड केलेली भात पिके पिवळे पडू लागली असून त्यावर सुकवा गेल्याचे जाणवत असल्याने त्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. अगोदरच येथील भात उत्पादक शेतकरी या वर्षी अनेक अडचणीत असताना आता करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडला आहे.
याकडे कृषी विभागाने गांभीर्याने लक्ष देवून रोगप्रतिबंधक उपाययोजना कराव्या व शासनाने तातडीने पंचनामे करण्याची मागणी येथील शेतकर्यांनी केली आहे.
पावसाला उघडीप मिळाल्याने भात पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. करपा नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून ग्राम स्तरावर उपाययोजना संदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे.
- शितलकुमार तंवर, तालुका कृषी अधिकारी, इगतपुरी.
भात पिकांचे पोषण होण्याचा हा कालावधी होता मात्र भात पिकावर करपा रोग जात असून पिके पिवळी पडून सूकवा जात आहे. आधीच या वर्षी भात पिके संकटात असताना आता करपा रोगामुळे नुकसान होत असल्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करावे. यामुळे तालुक्यातील शेतक-यांना दिलासा मिळेल.
- राजू रोकडे, शेतकरी, नांदूरवैद्य.
(फोटो १३ नासूरवैद्य, १)