बियाणे महागल्याने शेतकऱ्यांपुढे कांदा लागवडीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 15:41 IST2020-09-11T15:40:59+5:302020-09-11T15:41:08+5:30
खडकी: कांदा बियाणे तीस हजार रुपये पाहिली झाल्याने शेतकऱ्यांपुढे कांदा लागवडीचे संकट निर्माण झाले आहे. गतवर्षी कांद्याला दहा ते वीस हजारांचा दर मिळाल्याने रोपे तयार करण्यासाठीही कांदा शिल्लक नसल्याने बियाणे तयार झाले नाही.

बियाणे महागल्याने शेतकऱ्यांपुढे कांदा लागवडीचे संकट
खडकी: कांदा बियाणे तीस हजार रुपये पाहिली झाल्याने शेतकऱ्यांपुढे कांदा लागवडीचे संकट निर्माण झाले आहे. गतवर्षी कांद्याला दहा ते वीस हजारांचा दर मिळाल्याने रोपे तयार करण्यासाठीही कांदा शिल्लक नसल्याने बियाणे तयार झाले नाही. त्यामुळे यावर्षी उन्हाळ कांद्याचे बियाणे महागले असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
आधीच जास्त पावसामुळे लाल कांदा लागवड लांबणीवर पडली आहे. जी कांदा लागवड झाली तिच्यावर बुरशी आल्याने मूळ खराब होऊन उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदा कांद्याला चांगला दर मिळण्याची अपेक्षा असल्याने शेतकºयांनी आपला मोर्चा कांदा लागवडीकडे वळवला आहे. त्यामुळे बियाणांची टंचाई निर्माण झाली आहे. रोपे शोधण्यासाठी पूर्ण कुटुंब कामाला लागले आहे. नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कांदा पिकातून शेतकºयांना मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकरी दरवर्षी कांदा उत्पादन तोट्यात जात असले तरी कांदा लागवडीला प्राधान्यक्रम देतात. इतर पिकाच्या तुलनेत कांदा लागवडीसाठी मजुरीचा खर्च मोठा आहे.
चालू वर्षी कांदा बियाणे महागल्याने अडचण निर्माण झाली आहे. शासनामार्फत अनुदान अभियानामध्ये कांदा बियाणांचा समावेश नसल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. कांद्याचे बियाणे चार ते सहा हजार रुपये किलो या दराने खरेदी करण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. या महागाईने शेतकरी धास्तावले आहेत.