शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

नागरी बॅँकांपुढील संकट कायम

By admin | Updated: November 16, 2016 22:39 IST

नोटा बदलाचा परिणाम : ठेवायला नाही जागा, वाटपाला नाही नोटा

नाशिक : केंद्र सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर नागरी सहकारी बॅँकांपुढे गेल्या सात दिवसांपासून निर्माण झालेले प्रश्न आजही कायम असून, खातेदारांनी मोठ्या प्रमाणावर हजार, पाचशेच्या नोटा बॅँकात जमा केल्याने त्या ठेवायला जागा शिल्लक नाही, तर खातेदारांना त्यांच्या खात्यातून काढण्यासाठी बॅँकेकडे पैसेच शिल्लक नसल्याची बाब आज बॅँकांच्या अध्यक्षांनी प्रशासनाच्या कानावर घातली, मात्र आश्वासनापलीकडे त्यांच्या पदरी निराशाच पडली. सरकारने चलनातून बाद केलेल्या हजार व पाचशेच्या नोटा नागरिकांना त्यांच्या बॅँक व पोस्ट खात्यात डिपॉझिट करण्याची मुभा दिल्याने राष्ट्रीयिकृत बॅँकांप्रमाणे नागरी बॅँकांमध्येही गेल्या बुधवारपासून नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हजार व पाचशे रुपयांच्या नोटा भरण्यास सुरुवात केली. एकीकडे नोटांचा भरणा तर दुसरीकडे त्या बदल्यात चलनातील नोटा घेण्यासाठी खातेदारांनी गर्दी केली. परंतु नागरी बॅँकांच्या चेस्ट बॅँकांनी गेल्या सात दिवसांत नागरी बॅँकांना त्यांच्या मागणीप्रमाणे चलनाचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे नागरी बॅँकांवर ग्राहकांचा दबाव वाढत चालला असून, दुसरीकडे नागरी बॅँकांच्या भरण्यामध्ये प्राप्त झालेल्या कोट्यवधी रुपयांचा स्वीकार करण्यास स्टेट बॅँकेनेही नकार दिला आहे. अशा प्रकारे दुहेरी चरख्यात सापडलेल्या जिल्ह्यातील नागरी बॅँकांच्या अध्यक्षांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांना नागरी बॅँक असोसिएशनने निवेदन सादर केले. त्यावर योग्य ती उपाययोजना करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले व या संदर्भात अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांच्याशी चर्चा करण्याची सूचना केली. बगाटे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्टेट बॅँक तसेच रिझर्व्ह बॅँकेच्या मुंबईच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या निदर्शनास नागरी बॅँकांची उपरोक्त अडचण लक्षात आणून दिल्यावर त्यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. जिल्ह्यातील नागरी बॅँकांकडे जमा झालेले डिपॉझिट व त्यांच्याकडे होत असलेली मागणी याची माहिती सायंकाळपर्यंत स्टेट बॅँकेकडे ई-मेलद्वारे जमा करण्याची सूचना केली. यावेळी झालेल्या चर्चेत नागरी बॅँकेचे भास्करराव कोठावदे, विश्वास ठाकूर, माधवराव पाटील, रंजन ठाकरे, अजय ब्रह्मेचा, दत्ता गायकवाड, रामलाला सानप, शशीताई अहिरे, नाना सोनवणे, भालचंद्र कोठावदे, पंकज पारख, अशोक व्यवहारे, अशोक झंवर, मिर्झा बेग, शांताराम काटकर आदिंनी भाग घेतला. (प्रतिनिधी)