तडीपार गुन्हेगार साळवेस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 15:24 IST2017-07-25T15:24:11+5:302017-07-25T15:24:11+5:30
दोन वर्षासाठी नाशिक शहरासह जिल्ह्यातून तडीपार

तडीपार गुन्हेगार साळवेस अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे गत महिनाभरापुर्वी शहर तसेच जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार जॉर्ज साळवे यास सरकारवाडा पोलिसांनी उपनगर परिसरात अटक केली आहे़
शरणपूर रोडवरील बेथेलनगरमधील जार्ज संजय साळवे याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी २२ मे २०१७ पासून दोन वर्षासाठी नाशिक शहरासह जिल्ह्यातून तडीपार केले होते़ मात्र कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता तो उपनगर परिसरात राहत असल्याची माहिती पोेलिसांनी मिळाली होती़
तडीपार साळवेला सरकारवाडा पोलिसांनी सोमवारी (दि़२४) रात्री एक वाजेच्या सुमारास उपनगर परिसरातील नारायण बापू नगरमधील गणेश मंदिराजवळून ताब्यात घेतले़