गुन्हेगाराच्या खुनातील संशयिताला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 22:40 IST2019-09-05T22:39:51+5:302019-09-05T22:40:05+5:30
नाशिक : सराईत गुन्हेगार व मोबाइल चोर प्रवीण ऊर्फटकल्याचा गेल्या वर्षी खून झाला होता. या खून प्रकरणात फरार संशयित विकी वाघ याला पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे.

गुन्हेगाराच्या खुनातील संशयिताला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सराईत गुन्हेगार व मोबाइल चोर प्रवीण ऊर्फटकल्याचा गेल्या वर्षी खून झाला होता. या खून प्रकरणात फरार संशयित विकी वाघ याला पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे.
प्रवीण लोखंडे (३०) या सराईत गुन्हेगाराचा गेल्या वर्षी ११ सप्टेंबर २०१८ रोजी रात्री पेठरोडच्या पाटाजवळ संशयितांनी धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या खून प्रकरणात वाघ या संशयिताचा सहभाग होता व तो मागील वर्षभरापासून फरार झाला होता. वाघ हा गंगापूरगावात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास पाटील यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, पोलीस उपनिरीक्षक योगेश उबाळे आदींनी सापळा रचून वाघ याला ताब्यात घेऊन अटक केली.