लाचखोर ग्रामसेवकास पोलीस कोठडी
By Admin | Updated: March 4, 2015 01:20 IST2015-03-04T01:18:38+5:302015-03-04T01:20:52+5:30
लाचखोर ग्रामसेवकास पोलीस कोठडी

लाचखोर ग्रामसेवकास पोलीस कोठडी
नाशिक : रेशन दुकान चालविण्यासाठी बचत गटाने केलेल्या अर्जाचा ठराव ग्रामपंचायतीच्या बैठकीत ठेवून तो मंजूर करून तहसीलदारांच्या परवानगीस पाठविण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी करून ती स्वीकारणारे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुलवाडचे ग्रामसेवक पुंजाराम पांढरे यांना न्यायालयाने सहा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी ठक्कर बझार बस स्थानकाजवळील हॉटेल स्वामीसमोर तक्रारदाराकडून पाच हजार रुपये घेताना त्यांना रंगेहाथ पकडले होते़ (प्रतिनिधी)