शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत वाढतेय गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 18:35 IST

नाशिक : गत दोन महिन्यात एक-दोन नव्हे तर तब्बल सहा खुनांच्या घटना पंचवटी परिसरात घडल्या असून, पोलिसांचा वचक कमी झाल्याचाच हा परिणाम असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पंचवटीत गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व वाढत चालल्याने आगामी कालावधीत या टोळ्यांचा उपद्रव वाढण्याची शक्यता आहे़ या टोळ्यांच्या आपसातील वर्चस्व वादातून हाणामाऱ्या तसेच गंभीर गुन्ह्यांच्या घटना यापूर्वीही घडल्या असून, यामध्ये आगामी काळात आणखी वाढ होण्याची अशी भीती नागरिकांमध्ये आहे़ विशेष म्हणजे गुन्हेगारी टोळके डोके वर काढत असूनही पोलीस 'दंडुका' फिरवत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देगुन्हेगारीत वाढ : दोन महिन्यात सहा खून; पोलिसांचा वचक कमी

नाशिक : गत दोन महिन्यात एक-दोन नव्हे तर तब्बल सहा खुनांच्या घटना पंचवटी परिसरात घडल्या असून, पोलिसांचा वचक कमी झाल्याचाच हा परिणाम असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पंचवटीत गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व वाढत चालल्याने आगामी कालावधीत या टोळ्यांचा उपद्रव वाढण्याची शक्यता आहे़ या टोळ्यांच्या आपसातील वर्चस्व वादातून हाणामाऱ्या तसेच गंभीर गुन्ह्यांच्या घटना यापूर्वीही घडल्या असून, यामध्ये आगामी काळात आणखी वाढ होण्याची अशी भीती नागरिकांमध्ये आहे़ विशेष म्हणजे गुन्हेगारी टोळके डोके वर काढत असूनही पोलीस 'दंडुका' फिरवत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

फुलेनगर येथे कौटुंबिक वादातून मामांनी भाच्याचा केलेला खून, रामवाडीत पूर्ववैमनस्यातून युवकाची हत्या, कालिकानगर येथे प्रेयसीसह तिची मुलगी व नातीला जिवंत जाळून ठार केल्याची घटना तसेच बुधवारी फुलेनगर पाण्याच्या पाटाजवळ मोबाइलचोर गुन्हेगाराचा धारदार हत्याराने केलेला खून या सहा घटना अवघ्या दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीत घडल्या आहेत़ यामध्ये दोन दिवसांपूर्वीच्या खुनातील संशयित वगळता अन्य घटनेतील संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पंचवटी परिसरात काही महिन्यांपासून गुन्हेगारी टोळीशी संबंधित असलेल्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. या टोळीतील संशयितांमध्ये अनेकदा वर्चस्व वादातून वाद-विवाद होतात़, तर काहीजण परिसरात दहशत माजविण्याचा हेतूने वाहनांची जाळपोळ, विनाकारण वाद, हाणामाºया यासारखे कृत्य करतात. गुन्हेगारी टोळके तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले संशयित यांच्यावर पोलिसांचा वचक कमी झाल्याने हे संशयित पुन्हा दहशत माजवतात़ विशेष म्हणजे पोलीस प्रशासन यापासून अनभिज्ञ असल्याचे दाखविते. परिसरातील वाढती गुन्हेगारी व गुन्हेगारी टोळ्यांनी पोलिसांनाच आव्हान दिले असून, या गुन्हेगारांवर दंडुका फिरवण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस