अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 01:01 IST2019-12-20T01:01:11+5:302019-12-20T01:01:53+5:30

जुन्या चेहेडी शिवरोडवरील गाडेकर मळा परिसरात राहणाऱ्या एका संशयिताने येथील विवाहितेला ‘तुझ्या मुलाला उचलून नेले आहे...’ असे खोटे सांगून विवाहितेला एका लॉजवर घेऊन जात शारीरिक अत्याचार केल्याची घटना गुरुवारी (दि.१९) उघडकीस आली आहे.

Criminal case filed for torture | अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल

अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल

नाशिकरोड : जुन्या चेहेडी शिवरोडवरील गाडेकर मळा परिसरात राहणाऱ्या एका संशयिताने येथील विवाहितेला ‘तुझ्या मुलाला उचलून नेले आहे...’ असे खोटे सांगून विवाहितेला एका लॉजवर घेऊन जात शारीरिक अत्याचार केल्याची घटना गुरुवारी (दि.१९) उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सिन्नर फाटा परिसरात एका अपार्टमेंटमध्ये अमरावती जिल्ह्यातील पीडित महिला साफसफाईचे काम करते. त्याच सोसायटीमधील सुपरवायझर संशयित राज बैंद उर्फ अनिल मंगुराम बैंद (३७, रा. गौतमनगर, गोरेवाडी) याने त्या महिला सफाई कामगारास तुझ्या मुलाला उचलून नेले असल्याचे सांगत बिटको चौकातील एका लॉजमध्ये नेऊन तिला मारहाण करून जबरदस्तीने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Criminal case filed for torture