अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

By Admin | Updated: April 30, 2017 02:30 IST2017-04-30T02:29:43+5:302017-04-30T02:30:56+5:30

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी सिरसाठ व वित्त व्यवस्थापक बी़ टी़ कांकरिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल अपहारचा करण्यात आला आहे़

Crimes against the office bearers with the President | अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

नाशिक : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या बिलाची जमा केलेली रक्कम कॅनरा बँकेत जमा न करता महावितरण कंपनीची फसवूणक केल्याप्रकरणी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी वाय़आऱ सिरसाठ व वित्त व्यवस्थापक बी़ टी़ कांकरिया यांच्याविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार जिल्हा बँकेने १ मार्च ते २४ एप्रिल २०१७ या कालावधीत नाशिक व मालेगाव परिमंडळातील वीज ग्राहकांकडून ३३ कोटी २२ लाख ३७ हजार ९५७ रुपये जमा केले, मात्र महावितरणकडे हस्तांतरितच केले नाही. नाशिक व मालेगाव परिमंडळाचे वरिष्ठ व्यवस्थापक ललित संपत खाडे (रा. , सातपूर) व दिनकर रघुनाथ मंडलिक (रा. नाशिकरोड) यांनी जिल्हा बँकेसोबत मागील वर्षी करार केला होता. त्यानुसार वीज ग्राहकांची रक्कम कॅनरा बँकेत जमा करणे आवश्यक होते.
मात्र, जिल्हा बँकेने ग्राहकांकडून जमा केलेली वीज बिलाची रक्कम जमा न करता वीज महावितरण कंपनीची फसवणूक केल्याचे फिर्यादित म्हटले आहे़ त्यानुसार मुंबई नाका पोलिसांनी बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी वाय. आर. शिरसाठ, वित्त व्यवस्थापक बी. टी. कांकरिया यांच्याविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Crimes against the office bearers with the President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.