शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

जमाबंदीचे उल्लंघन : 'लॉकडाऊन'मध्ये साडेआठ हजार नागरिकांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 18:36 IST

दुकाने सुरू झल्याने अनेक नागरिक जीवनावश्यक वस्तुंचे कारण पुढे करत फिरण्यासाठी, किरकोळ कामांसाठी घराबाहेर पडत आहेत.

ठळक मुद्देदोन हजार 213 वाहने जप्तमास्क वापरत नसल्याने शहरात १ हजार ५८७ नागरिकांवर गुन्हे

नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात विनाकारण दुचाकीवर फिरून संचारबंदी आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरात सुमारे साडेआठ हजार नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर  २ हजार २१३ वाहने जप्त करण्यात आली.देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने २३ मार्चला लॉकडाऊन जाहिर करण्यात आला होता. यामध्ये टप्प्याटप्पयाने वाढ करण्यात आली आहे. प्रारंभी याची कडक अंमलबजावणी पोलीसांकडून सुरू होती. याकाळात नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याच्या सुचना दिल्या होत्या. सध्या जिल्हा प्रशासनाने शिथिलता दिली असली तरी आवश्यक सेवांसाठी बाहेर पडण्यास सांगण्यात आले आहे. मात्र सर्वच दुकाने सुरू झल्याने अनेक नागरिक जीवनावश्यक वस्तुंचे कारण पुढे करत फिरण्यासाठी, किरकोळ कामांसाठी घराबाहेर पडत आहेत. यातील काही बेशिस्त नागरिकांवर शहर पोलीस अद्यापही कारवाई करीत आहेत. त्यानुसार परिमंडळ एक मधील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ५ हजार २४९ आणि परिमंडळ दोनमधील सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ३ हजार १७० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वाधिक १ हजार ३१३ गुन्हे सरकारवाडा पोलीस ठाणे, तर त्याखालोखाल १ हजार २८० गुन्हे गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल करण्यात आले आहेत. अशा नागरीकांची २ हजार २१३ वाहने पोलीसांनी जप्त केली आहेत. यामध्ये सर्वाधिक २९५वाहने नाशिकरोड, त्याखालोखाल २९२ वाहने सातपूर पोलीसांनी जप्त केली आहेत. ही वाहने बॉण्डंद्वारे परत देण्यास सुरूवात केली असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगीतले.तसेच कोरोनाची लागण होऊ नये यासाठी सर्वांना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला. तरीदेखील काही नागरिक मास्क वापरत नसल्याने त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले आहेत. त्यानुसार शहरात १ हजार ५८७ नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात करोनाबाबत जिल्हाधिकार्‍यांचा आदेश,  कोरोना  बरा होण्याचे चुकीचे उपाय यासह विविध अफवा सोशल मिडियावर पसरवल्या प्रकरणी ८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस