विनयभंगाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:37 IST2020-09-23T22:47:09+5:302020-09-24T01:37:17+5:30
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात काम करणाऱ्या सहायक महिला कामगाराचा वेळोवेळी विनयभंग केल्याप्रकरणी कंपनीच्या बिझनेस हेडविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनयभंगाचा गुन्हा
ठळक मुद्देकॅबिनमध्ये पीडितेला बोलावून हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला,
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात काम करणाऱ्या सहायक महिला कामगाराचा वेळोवेळी विनयभंग केल्याप्रकरणी कंपनीच्या बिझनेस हेडविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित व्यवस्थापक कुमूदकुमार शर्मा याने पीडित सहायक महिला कामगाराशी वेळोवेळी अश्लील संवाद साधत विनयभंग केला. तसेच कॅबिनमध्ये पीडितेला बोलावून हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.