वैश्य वाड्याच्या दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:18 IST2021-07-07T04:18:39+5:302021-07-07T04:18:39+5:30

घनकर गल्ली येथे संजय जोशी यांनी त्यांच्या वाड्याचे नूतनीकरण सुरु केले होते. त्यासाठी त्यांनी वाडा पाडून खोदकाम सुरु केले ...

Crime filed in Vaishya Wadya accident case | वैश्य वाड्याच्या दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल

वैश्य वाड्याच्या दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल

घनकर गल्ली येथे संजय जोशी यांनी त्यांच्या वाड्याचे नूतनीकरण सुरु केले होते. त्यासाठी त्यांनी वाडा पाडून खोदकाम सुरु केले होते. त्यामुळे त्यांच्या वाड्याला लागून असलेले इतर वाड्यांच्या बांधकामालाही धोका निर्माण झाला. दरम्यान, जोशी यांना वैश्य कुटूंबियांनी बांधकाम न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष करून काम सुरु ठेवल्याचा आरोप वैश्य कुटुंबीयांकडून पोलिसांना दिलेल्या जबाबात करण्यात आला आहे. त्यातच शनिवारी वैश्य वाडा कोसळून संगीता अजित वैश्य (५५) व रिटा अभिषेक वैश्य (२७) या जखमी झाल्या. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मंगळवारी रात्री वाडामालक जोशी यांच्यासह ठेकेदार आणि जेसीबी चालकाविरोधात बेजबाबदार कृत्यामुळे वाड्याच्या भिंती कोसळण्यास तसेच वैश्य कुटुंबीयातील महिलांच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Crime filed in Vaishya Wadya accident case