मालेगावच्या दोन खासगी रुग्णालयांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 10:33 PM2021-06-09T22:33:01+5:302021-06-10T01:02:53+5:30

नाशिक : मालेगाव येथील सटाणा रोडवरील सिक्स सिग्मा व सनराईज रुग्णालयाच्या संचालकाने आरोग्य विभागातील करारनामा व प्रभाग १ कार्यालयातील करारनाम्यात तफावत करून महापालिकेची दोन लाख ३० हजार २५६ रुपयांची आर्थिक फसवणूक व दिशाभूल केल्याप्रकरणी संचालक रमणलाल कन्हैयालाल सुराणा यांच्याविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime filed against two private hospitals in Malegaon | मालेगावच्या दोन खासगी रुग्णालयांवर गुन्हा दाखल

मालेगावच्या दोन खासगी रुग्णालयांवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देमहापालिकेची कारवाई : सुमारे सव्वादोन लाख रुपयांची फसवणूक

नाशिक : मालेगाव येथील सटाणा रोडवरील सिक्स सिग्मा व सनराईज रुग्णालयाच्या संचालकाने आरोग्य विभागातील करारनामा व प्रभाग १ कार्यालयातील करारनाम्यात तफावत करून महापालिकेची दोन लाख ३० हजार २५६ रुपयांची आर्थिक फसवणूक व दिशाभूल केल्याप्रकरणी संचालक रमणलाल कन्हैयालाल सुराणा यांच्याविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या ७ जून रोजी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कृषिमंत्री दादा भुसे यांनी संबंधित खासगी रुग्णालयावर कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा अल्टिमेटम महापालिकेला दिला होता. यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेने रुग्णालयाची पाहणी व कागदपत्रांची पडताळणी केली. यात प्रथम दर्शनी रुग्णालय संचालक सुराणा यांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी महापालिकेचे उपआयुक्त राजू खैरनार यांनी छावणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिक्स सिग्मा व सनराईज रुग्णालयाने रजिस्ट्रेशन करण्यासाठी महापालिकेच्या तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांच्याकडे २१ नोव्हेंबर २०२० रोजी अर्ज केला होता. या अर्जासोबत त्यांनी अग्निशमन विभागाचा दाखला जोडला होता. अग्निशमन अधिकाऱ्यांनी ८ फेब्रुवारी २०२० रोजी दाखला दिल्याचे नमूद केले होते. मात्र, मुख्य अग्निशमन अधिकारी संजय पवार यांनी रुग्णालय व्यवस्थापनाकडून अग्निशमन ना हरकत प्रस्ताव सादर केला नसल्याने त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलेले नसताना रुग्णालयाच्या संचालकांनी बनावट दाखल्यावर सिक्स सिग्मा व सनराईज रुग्णालय असे नाव टाकून ना हरकत दाखला तयार करून महापालिकेची फसवणूक केली.

आरोग्य अधिकाऱ्यांना हटविले
महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांना पदावरून हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी मनपा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. हेमंत गढरी यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयांकडून कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांकडून अवाजवी बिले आकारली जात होती. तसेच सिक्स सिग्मा व सनराईज रुग्णालयाच्या प्रकरणामुळे महापालिका कारवाई करीत नसल्यामुळे लोकप्रतिनिधींचा रोष वाढला होता. या पार्श्वभूमीवर डॉ. ठाकरे यांचा पदभार काढून घेण्यात आला आहे.

 

Web Title: Crime filed against two private hospitals in Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.