चौघांविरूद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:01 IST2018-05-09T00:01:20+5:302018-05-09T00:01:20+5:30
मालेगाव : शहरातील वरळी रस्त्यावर पिकअपमधून जनावरांचे एक हजार ५०० किलो मांस वाहतूक करणाऱ्या चौघा जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौघांविरूद्ध गुन्हा दाखल
मालेगाव : शहरातील वरळी रस्त्यावर पिकअपमधून जनावरांचे एक हजार ५०० किलो मांस वाहतूक करणाऱ्या चौघा जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मांस व पिकअप असा सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहरातील वरळी रोडवर जनावरांच्या मांसाची वाहतूक करून विक्री होणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार, पोलीस हवालदार गणेश न्हावकर, इम्रान सय्यद, काळू माळी आदींच्या पथकाने पिकअप क्रमांक एमएच ४१ जी ९२६८ हिची तपासणी केली असता एक हजार पाचशे किलो मांस नसीरखान अहमदखान वाहतूक करताना आढळून आला. याप्रकरणी पिकअप मालक, अरशद आमीन, मुजाहीद ऊर्फ मुज्जु या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.