शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

गुन्हे शाखा : पुण्यातून चोरलेला ट्रॅक्टरसह नऊ दुचाकी हस्तगत; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 3:47 PM

महिनाभरापासून शहरातील विविध भागांमधून दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. शहरात दुचाकी चोरी करणारी टोळी सक्रीय असल्याची शंका नागरिकांकडून घेतली जात होती.

ठळक मुद्दे पुणे येथील उड्डाणपुलाखील उभा केलेला ट्रॅक्टर ट्रॅलीसह चोरी अंबडमधील चोरट्याकडून तीन दुचाकी हस्तगत

नाशिक : महिनाभरापासून शहरातील विविध भागांमधून दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. शहरात दुचाकी चोरी करणारी टोळी सक्रीय असल्याची शंका नागरिकांकडून घेतली जात होती. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने तपास सुरू करत दोघा दुचाकीचोरट्यांचा यशस्वीपणे माग काढला. त्यांना ताब्यात घेत विविध कंपन्यांच्या चोरीच्या नऊ दुचाकींसह एक ट्रॅक्टर असा एकूण साडेसात लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, शहरासह उपनगरीय भागांमधून दुुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. याबाबत पोलीस उपआयुुक्त विजय मगर, सहायक आयुक्त अशोक नखाते यांनी गुन्हे शाखा, युनिट-१/२ च्या पथकाला माहिती देत तत्काळ तपास करुन शहरात सक्रिय असलेल्या दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचा ‘टास्क’ दिला. यानुसार पथकाचे सहायक पोलीस निरिक्षक दिपक गिरमे, हवालदार बाळासाहेब दोंदे, अनिल दिघोळे, शांताराम महाले, रावजी मगर आदिंनी तपासचक्रे फिरविली. दरम्यान, एका गुप्त माहितीगाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पथकाने पोलीस निरिक्षक आनंदा वाघ यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचला. गोल्फ क्लब जॉगिंग ट्रॅकच्या प्रवेशद्वारावर दोघे संशयित चोरटे आले. यावेळी साध्या गणवेशातील पोलिसांच्या पथकाने दोघांच्या मुसक्या बांधल्या. संशयित गणेश नारायण रसाळ (३३.रा. सिन्नर), सुनील साहेबराव देशमुख (२४, रा.नेहरुनगर पुणे) या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना खाकीचा हिसका दाखविला असता त्यांनी त्यांच्या ताब्यातील दुचाकी शिर्डी संस्थानच्या दवाखान्याच्या वाहनतळामधून चोरी केल्याची कबुली दिली. तसेच शिर्डी बसस्थानक, सिन्नर परिसरातून एकूण नऊ दुचाकी चोरल्याचे सांगितले. तसेच भोसरी, पुणे येथील उड्डाणपुलाखील उभा केलेला ट्रॅक्टर ट्रॅलीसह चोरी केल्याचे सांगितले. त्यांनी दडवून ठेवलेला हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.अंबडमधील चोरट्याकडून तीन दुचाकी हस्तगतजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात दुचाकी चोर येणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेचे सहायक उप्निरिक्षक जाकीर शेख, हवालदार रवींद्र बागूल यांना मिळाली होती. त्यांनी रुग्णालयाच्या परिसरातसापळा रचला. पोलिसांनी संशयित मेहताब मोहंमद अफ्फान खान (२७, रा. अंबड) यास परिसरातून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने एकूण ६५ हजार रुपये किंमतीच्या तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPolice Stationपोलीस ठाणेPuneपुणेnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय