आयपीएलच्या क्रिकेट मॅचवर बेटिंग लावणाऱ्यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:14 IST2021-09-25T04:14:45+5:302021-09-25T04:14:45+5:30
सिन्नर : आयपीएलच्या क्रिकेट मॅचवर बेटिंग लावण्याच्या तयारी असलेल्या दोघा संशयितांना सिन्नर पोलिसांनी बेटिंग नावाचा जुगार खेळताना व खेळविताना ...

आयपीएलच्या क्रिकेट मॅचवर बेटिंग लावणाऱ्यांवर गुन्हा
सिन्नर : आयपीएलच्या क्रिकेट मॅचवर बेटिंग लावण्याच्या तयारी असलेल्या दोघा संशयितांना सिन्नर पोलिसांनी बेटिंग नावाचा जुगार खेळताना व खेळविताना साहित्य व रकमेसह मिळून आल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सिन्नर शहरातील चौदाचौक वाड्या येथील स्टेट बॅंक आॅफ इंडियांच्या गेट समोरील चिंचेच्या झाडाजवळ दोन युवक बंगलोर व चेन्नई आयपीएल क्रिकेट मॅचवर अॅडव्हान्स मोबाईल फोनद्वारे पैसे लावून बेटिंग नावाचा जुगार खेळताना व खेळविताना साहित्य रकमेसह मिळून आले. पोलिसांनी या दोघांची अंगझटती घेतल्यानंतर त्यांच्याकडे दोन मोबाइल व रोख ८ हजार ३५० रुपये मिळून आले. पोलिसांनी देवा हरिभाऊ जाधव (३५) रा. लिंगटांगवाडी ता. सिन्नर व संकेत सुनील काळे (२९) रा. पाचोरे गल्ली, गावठा, सिन्नर या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर बेटिंग नावाचा जुगार खेळविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर दोघांवर जामिनावर मुक्तता झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक रामदास धुमाळ अधिक तपास करीत आहेत.