चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:09 IST2018-05-05T00:09:42+5:302018-05-05T00:09:42+5:30
मालेगाव : गौण खनिज वाहतुकीचा परवाना नसताना बनावट पावत्यांच्या आधारे शासनाची फसवणूक करून वाळू वाहतूक करणाºया तसेच पोलीस अधिकाºयांना व्हॉट्स अॅपवरून धमकी दिल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
मालेगाव : गौण खनिज वाहतुकीचा परवाना नसताना बनावट पावत्यांच्या आधारे शासनाची फसवणूक करून वाळू वाहतूक करणाºया तसेच पोलीस अधिकाºयांना व्हॉट्स अॅपवरून धमकी दिल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कारवाई करीत असताना अशोक देवराम पाटील रा. गुलाडी, ता, जि. धुळे, पवन कचरे ऊर्फ गणपत रा. दोंडाईचा, रोहित ऊर्फ सनी सुनील बोरसे रा. मोहाडी ता.जि. धुळे, कुंदन मुकुंद खानविलकर रा. नवी मुंबई, सुदर्शन राजकुमार बडगुजर रा. धुळे यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास गुरव हे करीत आहेत.