छावाविरु द्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:53 IST2020-07-28T23:41:01+5:302020-07-29T00:53:25+5:30

नाशिकरोड : छावा जनक्र ांती संघटनेच्यावतीने विभागीय आयुक्त कार्यालय आवारातील शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर सोमवारी पूर्वपरवानगी न घेता घोषणा देत आंदोलन केले होते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता इतरांच्या जिवाला धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime against the shadow | छावाविरु द्ध गुन्हा

छावाविरु द्ध गुन्हा

ठळक मुद्देनाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : छावा जनक्र ांती संघटनेच्यावतीने विभागीय आयुक्त कार्यालय आवारातील शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर सोमवारी पूर्वपरवानगी न घेता घोषणा देत आंदोलन केले होते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता इतरांच्या जिवाला धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस कर्मचारी राजेश साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, छावा जनक्र ांती संघटनेच्या सचिव अ‍ॅड. अलका मोरे यांनी दोन दिवसांपूर्वी नाशिकरोड पोलीस ठाण्यात शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे यापूर्वी दिलेल्या निवेदनावर कारवाई झाली नाही म्हणून सोमवारी आंदोलन करण्यात येणार असल्याचे पत्र पोलीस ठाण्यात दिले होते.
पोलिसांनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव बवाल यांना फौजदारी प्रक्रि या संहिता कलम १४९ प्रमाणे अटी-शर्तींचे पालन करण्याची नोटीस बजावली होती. सोमवारी सात आठ जणांनी आंदोलना दरम्यान घोषणाबाजी केली. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime against the shadow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.