मालेगावी बलात्कार करणाºयाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:25 IST2018-02-09T00:25:20+5:302018-02-09T00:25:20+5:30

मालेगाव : सोयगाव भागातील स्वप्नपूर्तीनगर येथे राहणाºया २९ वर्षीय परप्रांतीय विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध करणाºया किशोर पोतदार (सोनार), याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime against Malegaon rape | मालेगावी बलात्कार करणाºयाविरुद्ध गुन्हा

मालेगावी बलात्कार करणाºयाविरुद्ध गुन्हा

मालेगाव : सोयगाव भागातील स्वप्नपूर्तीनगर येथे राहणाºया २९ वर्षीय परप्रांतीय विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तसेच तिला धमकी व दमदाटी करून वेळोवेळी शारीरिक संबंध करणाºया किशोर पोतदार (सोनार), रा. मालेगाव याच्याविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात बलात्कार, मारहाण व दमदाटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी २९ वर्षीय मूळची झारखंड राज्यात राहणारी व हल्ली स्वप्नपूर्तीनगर येथे वास्तव्यास असलेल्या पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. पीडित महिलेच्या पतीचे निधन झाल्यामुळे तिने जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाइटवर दुसºया विवाहासंबंधी माहिती दिली होती. पोतदार यांनी सदर महिलेशी संपर्क साधून माझाही घटस्फोट झाला आहे, अशी खोटी माहिती देऊन महिलेला लग्नाचे आमिष दाखविले. मार्च २०१७ मध्ये मालेगावी बोलावून पोतदार कॉलेजात ग्रंथपाल म्हणून नोकरी लावून दिली. दरम्यान, किशोर पोतदार हा त्याची पत्नी व मुलासह राहत असल्याची माहिती पीडित महिलेला मिळाली होती.

Web Title: Crime against Malegaon rape

टॅग्स :Crimeगुन्हा