जातिवाचक शिवीगाळ करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा

By Admin | Updated: February 10, 2016 22:49 IST2016-02-10T22:49:13+5:302016-02-10T22:49:42+5:30

जातिवाचक शिवीगाळ करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा

Crime Against Four Thieves | जातिवाचक शिवीगाळ करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा

जातिवाचक शिवीगाळ करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा


मालेगाव : ग्रामपंचायत निवडणुकीत भाग घेतल्याच्या कारणावरून
कुरापत काढून पळासदरे येथील यशवंत गुलाबराव दळवी यांना मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
१४ व २० सप्टेंबर २०१५ रोजी
ही घटना घडली. यशवंत दळवी
यांनी दिलेल्या फिर्यादीवरून
काल सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. भागचंद कौतिक पवार (५०), योगेश भागचंद पवार, ताराचंद कौतिक पवार आणि प्रवीण
भागचंद पवार यांनी संगनमत
करून ग्रामपंचायत निवडणुकीत
भाग घेतला या कारणावरून त्याला अश्लील भाषेत जातिवाचक शिवीगाळ केली.
भागचंद व योगेश यांनी
रस्त्यावर ओढून पाडले. ताराचंद
व प्रवीण यांनी मारहाण केली.
दळवी यांची पत्नी सोडविण्यास आली असता तिचाही विनयभंग
केला व जिवे ठार मारण्याचा
प्रयत्न केला म्हणून गुन्हा
दाखल करण्यात आला. अधिक
तपास पोलीस उपअधीक्षक नखाते करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Crime Against Four Thieves