विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या चौघांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 01:05 IST2020-12-24T22:11:52+5:302020-12-25T01:05:05+5:30
सिन्नर : तालुक्यातील पिंपरवाडी (यशवंतनगर) येथील विवाहितेने दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.२४) सायंकाळी घडली होती. याप्रकरणी विवाहितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या चौघा संशयितांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या चौघांविरोधात गुन्हा
सिन्नर : तालुक्यातील पिंपरवाडी (यशवंतनगर) येथील विवाहितेने दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.२४) सायंकाळी घडली होती. याप्रकरणी विवाहितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या चौघा संशयितांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरवाडी येथील मनीषा अनिल गायकवाड (३०) या विवाहितेने चार वर्षाची मोठी मुलगी व चार महिन्याच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी विवाहितेचा भाऊ राजेंद्र खुजरे (रा. नगरसूल ता. येवला) यांनी सासरी बहिणीचा मानसिक व शारीरिक छळ झाल्याचे म्हटले आहे. बहीण मनीषा हिस दोन मुली झाल्या तसेच माहेरुन पैसे आणावेत आणि पतीच्या अनैतिक संबंधास विरोध केल्याने तिचा सासरी छळ केला जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सासरच्या जाचाला कंटाळूनच तिने आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी पती अनिल त्र्यंबक गायकवाड, सासू मालन त्र्यंबक गायकवाड, भाया संजय त्र्यंबक गायकवाड व जाऊ वनिता संजय गायकवाड या चौघा संशयितांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती वावी पोलिसांनी दिली. याप्रकरणी चौघांही संशयितांना अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते अधिक तपास करीत आहेत.