विवाहितेच्या छळ प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:14 IST2018-05-27T00:14:56+5:302018-05-27T00:14:56+5:30
नाशिकरोड : फ्लॅट घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावे म्हणून विवाहितेचा मानसिक, शारीरिक छळ करून मारहाण केल्याप्रकरणी सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहितेच्या छळ प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा
नाशिकरोड : फ्लॅट घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावे म्हणून विवाहितेचा मानसिक, शारीरिक छळ करून मारहाण केल्याप्रकरणी सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीजीपीनगर येथे राहणाऱ्या विवाहिता आरोही ऊर्फ रेश्मा गणेश दळवी यांनी याविषयी फिर्याद दिली आहे.
म्हटले आहे की, २८ फेब्रुवारी २०१७ रोजी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील गणेश पांडुरंग दळवी यांच्याशी झाला होता. विवाहाच्या १५ दिवसानंतर सासरच्या लोकांनी घरगुती कारणावरून कुरापत काढून शिवीगाळ करत सतत मारहाण करण्यास सुरुवात केली. २८ आॅगस्ट २०१७ रोजी माझे आईवडिल समझोता करण्यासाठी आले असता सासरच्या नातेवाइकांनी शिवीगाळ करत मारण्यास धावले.
लग्नात घातलेले सोन्याचे स्त्रीधन काढून घेत मला घराबाहेर हुसकून दिले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात पती गणेश दळवी, सासू संगीता पांडुरंग दळवी, सासरे पांडुरंग खाषेराव दळवी, (सर्व, रा. कळंब, पुणे), नणंद सारिका संतोष पवार, रा. नागापूर, आंबेगाव पुणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.