आत्महत्त्येप्रकरणी पाच जणांविरूद्ध गुन्हा

By Admin | Updated: June 29, 2014 00:13 IST2014-06-28T22:34:33+5:302014-06-29T00:13:02+5:30

आत्महत्त्येप्रकरणी पाच जणांविरूद्ध गुन्हा

Crime against five accused in suicide case | आत्महत्त्येप्रकरणी पाच जणांविरूद्ध गुन्हा

आत्महत्त्येप्रकरणी पाच जणांविरूद्ध गुन्हा


मालेगाव : सोयगाव नववसाहतीतील अशोक जिभाऊ काकळीज (५७) यांना विषारी औषध सेवन करून आत्महत्त्येस प्रवृत्त करणाऱ्या त्यांचे भाऊबंद नातलगांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संदिप काकळीज यांनी फिर्याद दिली.
कासूबाई श्रावण काकळीज, रा. वाखारी, मनीषा विजय सूर्यवंशी, विजय वाल्मीक सूर्यवंशी, रा. खायदे, मधुकर जिभाऊ काकळीज, हिराबाई मधुकर काकळीज, जितेंद्र मधुकर काकळीज तिघे, रा. नाशिक, प्रकाश जिभाऊ काकळीज, रंजना जिभाऊ काकळीज रा. वाखारी या आठ जणांनी संगनमताने मयत अशोक काकळीज यांना शेतीच्या वाटणीवरून शिवीगाळ व दमदाटी करीत खोट्या तक्रारी करुन जमिनीचा वाटा मागे घेण्यासाठी पाच लाखांची मागणी केली.
पैसे दिले नाही तर पुन्हा तक्रारी करू असा दम दिल्याने मानसिक त्रासाला कंटाळून अशोक काकळीज यांनी आत्महत्या केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक निकम करीत आहेत. ं

Web Title: Crime against five accused in suicide case