विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी सासरच्या विरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 00:30 IST2020-09-06T23:41:39+5:302020-09-07T00:30:01+5:30
चांदवड : कानडगाव येथील विवाहिता यशोदा नाना गवळी (२२) हिने माहेरून मेंढ्या घेण्यासाठी सात लाख रुपये आणावे या मागणीसाठी या विवाहितेचे पती नाना बापू गवळी, सासरे बापू चिमन गवळी व दीर बाळू बापू गवळी, जेट गणेश बापू गवळी, सासू कल्याबाई बापू गवळी, जेठाणी वाल्याबाई गणेश गवळी यांनी शारीरिक, मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद विवाहितेचे वडील रामा महादू दगडे रा. जामदरी शिवार, ता. नांदगाव यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिल्याने चांदवड पोलिसांनी या तिघांविरोधात हुंंडाबळीचा गुन्हा दाखल केला असून, तिघांना चांदवड न्यायालयात उभे केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी सासरच्या विरोधात गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : कानडगाव येथील विवाहिता यशोदा नाना गवळी (२२) हिने माहेरून मेंढ्या घेण्यासाठी सात लाख रुपये आणावे या मागणीसाठी या विवाहितेचे पती नाना बापू गवळी, सासरे बापू चिमन गवळी व दीर बाळू बापू गवळी, जेट गणेश बापू गवळी, सासू कल्याबाई बापू गवळी, जेठाणी वाल्याबाई गणेश गवळी यांनी शारीरिक, मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद विवाहितेचे वडील रामा महादू दगडे रा. जामदरी शिवार, ता. नांदगाव यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिल्याने चांदवड पोलिसांनी या तिघांविरोधात हुंंडाबळीचा गुन्हा दाखल केला असून, तिघांना चांदवड न्यायालयात उभे केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
याप्रकरणी चांदवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.